गुगल असिस्टंट

गुगलने नुकताच त्यांच्या "गुगल IO" या वार्षिक संमेलनामध्ये गुगलच्या आगामी सेवांची घोषणा केली. त्यापैकी "गुगल असिस्टंट" ही एक जबरदस्त सेवा आहे. "गुगल असिस्टंट" म्हणजे आपल्याबरोबर बोलणारा, सतत आपल्यासोबत असणारा (मोबाईलमध्ये), आपली गरज ओळखून उचित माहिती देणारा एक पर्सनल असिस्टंट
असणार आहे.

गेल्या दहा वर्षात २०० हून अधिक मानवी भाषा , त्यांचे अर्थ, आणि गुगलला जगभरातून दररोज विचारले जाणारे करोडो प्रश्न यांची सांगड घालून गुगलने ही नवी सेवा बनविली आहे. खालील लिंक मध्ये दिलेला व्हीडीओ बघून तुम्हाला कल्पना येईल की "गुगल असिस्टंट" म्हणजे काय धमाल सेवा आहे ते !


तुमच्या मोबाईलमध्ये असलेली "ओके गुगल" ही अप्रतीम सुविधा तुम्ही वापरून पाहिली आहे का? नसेल तर हा खाली दिलेला मराठी व्हिडिओ आजच पहा -